श्री पांडुरंगाची आरती
जय देव जय देव जय पांडुरंगा | आरती ओवाळू भावे जिवलगा || धृ ||
पंढरीक्षेत्रासी तू अवतरलासी | जगदुद्धारासाठी राया तू फिरसी |
भक्तवत्सल खरा तू एक होसी | म्हणुनी शरण आलो तुझे चरणांसी || १ ||
त्रिगुण परब्रम्ह तुझा अवतार | त्याची काय वर्णू लीला पामर |
शेषादिक शिणले त्यां न लागे पार | तेथे कैसा मूढ मी करू विस्तार || २ ||
देवाधिदेवा तू पंढरीराया | निर्जर मुनिजन घ्याती भावें तंव पायां |
तुजसी अर्पण केली आपुली मी काया | शरणागता तारी तू देवराया || ३ ||
अघटीत लीला करुनी जड मूढ उद्धरिले | कीर्ती ऐकुनी क नी चरणी मी लोळे |
चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले | तुझ्या भक्तां न लागे चरणांवेगळे |
जय देव जय देव जय पांडुरंगा | आरती || ४ ||